google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

बिटको कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी संरक्षण क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन… कर्नल अनिल बेदरकर यांनी दिल्या टिप्स…

नाशिकरोड :- ” आपले आयुष्य यशस्वी होण्यासाठी आज कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतानांच विचार करण्याची योग्य वेळ असून सशस्त्र सेनेत करिअर करायचे असेल तर अभ्यासाबरोबरच खूप कष्ट व मेहनत घेण्याची क्षमता असायला हवी. त्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्यात योग्यता, वैशिष्ट्ये व आवड असावी. संरक्षण दलातील करिअर म्हणजे जॉब नोकरी नसून सेवापरमोधर्म या तत्त्वाने देशासाठी अविरत सेवा आहे. अनेक […]

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने गणेश कला व क्रीडा मंच येथे आयोजित गुरुजन गौरव समारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी केंद्रीय […]

नाशिकरोड येथील सराफी दुकानात चोरी…

नाशिक – सराफी दुकान फोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. ही घटना नाशिकरोड येथील इस्टीम टावर भागात घडली असून दुकानातील सुमारे ८२ हजार रूपये किमतीचे दागिणे लांबविण्यात आले आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीदास गजानन दुसाने (रा.लोखंडे मळा,लक्ष्मण नगर जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. इस्टीम टॉवर या इमारतीतील दुसाने ज्वेलर्स […]

जिल्हा पोलीस दलातील 476 पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या

जिल्हा पोलीस दलातील 476 पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या आज (शनिवार) करण्यात येणार आहे. ज्या पोलीस अंमलदारांना 31 मे, 2024 रोजी एका पोलीस ठाण्यात/ शाखेत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत अशा अंमलदारांकडून तीन पसंतीच्या ठिकाणासह अर्ज मागविण्यात आले होते. अशा बदलीपात्र अंमलदारांना आज येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 11 वाजता बोलविण्यात आले आहे. प्रत्येक अंमलदारांना […]

नववी – दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

सालाबादप्रमाणे या हीवर्षी डांग सेवा मंडळ संचलित एकलव्य आश्रमशाळ(उंबरठाण), गिरजादेवी आश्रम शाळा(शिंदे दिगर), पंडित जवाहरलाल नेहरू आश्रमशाळा ( कुकडणे) या तीन आश्रमशाळांमधील कर्मवीर भाऊराव पाटील दत्तक पालक योजना आणि डांग सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नववी – दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डांग सेवा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा हेमलताताई बिडकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या […]

“गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत आषाढी एकादशी उत्सवात पर्यावरण संरक्षणाचा संदेश”

आपला महाराष्ट्र वृत्त :- गोखले एज्युकेशन सोसायटीचे अरविंद मनोहर पंत कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक या शाळेत आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा, शाळेच्या अधीक्षिका श्रीमती. सुरेखा जोगी मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती. शितल राठोड मॅडम यांनी विठ्ठल मूर्तीचे व पालखीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली . शालेय परिसरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची दिंडी […]

संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा व शहर जम्बो कार्यकारणी जाहीर..

संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्ह्याची कार्यकारणी काही दिवसापूर्वी बरखास्त करण्यात आली होती परंतु आताच्या विधानसभा व स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा व शहर जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व लोकशाहीर साहित्यसम्राट कॉ.अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनी अभिवादन करून संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण नाना वाघ अनिल आहेर […]

आषाढी एकादशीनिमित्त गोखले एज्युकेशन सोसायटीच्या माधवराव लेले विद्यालयात वारीचा जल्लोष….

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा…नाही पंढरीशी जाणे | नाही केली कधी वारी ||माझी कर्मभूमी हीच| माझी रोजची पंढरी||जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला| त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला||विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तांचे गणवेश करून, विठू नामाचा गजर करत वृक्षदिंडी सोहळा संपन्न केला. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री […]

300 फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अन्वी कामदारचा मृत्यू

प्रसिद्ध ‘रील स्टार’आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार असे तिचे नाव असून ती मुंबईतील रहिवासी आहे. अन्वी ही तिच्या मित्र मैत्रिणींसह रायगड मधील माणगाव आली होती. सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता. मात्र त्यावेळीच तिचा पाय घसरून दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. 27 वर्षांची अन्वी ही उच्च शिक्षित […]

प्रेमप्रकरणातील वादातून दोघांचा मृत्यू

पायरपाडा हतगड येथे तीन सख्खे भाऊ व पुतण्या या चौघांनी मिळून वृद्धाला दांडक्याने मारझोड केल्याने वृध्द ठार झाल्याने या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.11 जुलै रोजी संशयित आरोपी पांडुरंग रामू बागुल (40), गोपाळ रामू बागुल (55), चंदर रामू बागुल (53), सोमनाथ चंदर बागुल (30) सर्व राहणार हतगड […]