मुंबई, दि. 7 :- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम् व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सचिव प्रवीण पुरो, माहिती व […]
राज्यात महायुती सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा पेच अखेर सुटला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली असून तेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. आज भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर आशिष शेलार व रवींद्र चव्हाण […]
राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने राबवलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असून त्यात मानधन वाढीची शक्यता आहे. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योजनेबाबत स्पष्टता देत महायुती सरकारच्या संकल्पपत्रातील आश्वासन पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे. मुनगंटीवार यांनी नमूद केले की, वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कुटुंबातील महिलांना तसेच कर भरणाऱ्या महिलांना […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला असून, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरुन भाजप आणि इतर घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, भाजपच्या १३२ जागांवरील विजयामुळे […]
मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप सर्वाधिक जागा मिळवून राज्यातील प्रमुख पक्ष ठरला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच आपला राजीनामा दिला असून, सध्या त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. गुरुवारी रात्री दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. […]
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर राज्यात अजूनही सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीने मिळवलेल्या प्रचंड बहुमतानंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोणाच्या गळ्यात माळ पडणार यावर सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस […]
महाराष्ट्र विधानसभेच्या 14 व्या कार्यकाळाची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, महायुतीच्या सरकारच्या सत्तास्थापनेसाठी ताणलेला पेच अजून सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मुख्यमंत्रीपदावर वाद निर्माण झाल्याने राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून दोन ऑफर, शिंदे नाराज:मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. […]
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी व केलेले काम उल्लेखीनय आहे, अशा शब्दात मख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी कौतुक केले. यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे […]
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता महायुती सरकारने राज्यात नवीन सरकार […]