मुंबई : ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी ‘एनसीसी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. ‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या […]
निफाड: निफाड तालुक्यात थंडीचा मुक्काम वाढत असून, आज शनिवार (दि. ३०) रोजी कुंदेवाडी येथील कृषि संशोधन केंद्रात पारा सात अंशांवर घसरल्याची नोंद झाली आहे. चालू हंगामातील हे नीचांकी तापमान असून द्राक्ष बागाईतदारांसाठी ही थंडी चिंतेचा विषय बनली आहे. घसरलेल्या तापमानामुळे तयार होत असलेल्या द्राक्षमालाची फुगवण थांबण्याची शक्यता आहे, तर परिपक्व द्राक्षमालाला तडे जाण्याचा धोका निर्माण […]
नाशिक: कांदा लागवड न करता पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्त क्षेत्र दाखवून विमा उतरविल्याचा प्रकार कृषी विभागाच्या तपासणीत उघडकीस आला आहे. संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव आणि पाथर्डी या सात तालुक्यांतील तब्बल 7,241 शेतकऱ्यांनी 2,055.98 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड नसतानाही विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले. कृषी विभागाच्या तपासणीनंतर बनावट अर्ज रद्द करण्याच्या सुचनेमुळे […]
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महापरिनिर्वाणदिना’निमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील […]
मुंबई : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जागतिक एड्स दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ०२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर आधारित प्रदर्शन स्टॉल, लोककलापथक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींचे मनोगत तसेच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांचा सत्कार इ. कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. जागतिक एड्स दिन दरवर्षी ०१ डिसेंबर रोजी पाळला जातो. […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला असून, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरुन भाजप आणि इतर घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, भाजपच्या १३२ जागांवरील विजयामुळे […]
मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप सर्वाधिक जागा मिळवून राज्यातील प्रमुख पक्ष ठरला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच आपला राजीनामा दिला असून, सध्या त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. गुरुवारी रात्री दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. […]
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर राज्यात अजूनही सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीने मिळवलेल्या प्रचंड बहुमतानंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोणाच्या गळ्यात माळ पडणार यावर सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस […]
नाशिक – संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त गणेशवाडी, पंचवटी येथील स्मारकास अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी फुले दाम्पत्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करत, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संभाजी ब्रिगेडने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनाला खरा ‘शिक्षकदिन’ घोषित करण्याची मागणी केली. फुले यांनी समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवून शैक्षणिक क्रांती […]
चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावाच्या हद्दीत टोमॅटो पिकात गांजाची आंतरपीक घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वडनेर भैरव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत २१५ किलो वजनाची व सुमारे ₹१३ लाख किमतीची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार […]