नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 46% मतदानाची नोंद झाली आहे. काही महत्त्वाचे आकडे असे आहेत: सर्वाधिक मतदान दिंडोरी (59%) येथे झाले असून, बागलाण (39%) येथे सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
नाशिक :- नाशिकमधील S.M.R.K.B.K.A.K. महिला महाविद्यालयातील श्रीमती संजोगा अहिरवार यांनी आपल्या मुलीच्या गंभीर प्रकृतीमुळे विधानसभा निवडणूक २०२४ साठीची नियुक्ती रद्द करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज केला आहे. डॉक्टरांनी मुलीची बाळंतपणाची तारीख २० नोव्हेंबर २०२४ दिली असून, या काळात निवडणूक कामकाजात सहभागी होणे त्यांच्या दृष्टीने शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अर्जासोबत संबंधित वैद्यकीय कागदपत्रे […]
मुंबई : आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे. आदिवासी विकास विभागाने ५ ऑक्टोबर २०२४ ला विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर ठेवली होती. त्यास आता १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. […]
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत शिये- बावडा तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने (SST) दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी 2 हजार 533 वाहनांची तपासणी केली. यातील एमएच 46 बीएम 4297 पिकअप हे वाहन तपासले असता त्यात 15 लाख 61 हजार 857 रुपये इतकी रक्कम आढळून आली असून या रक्कमेबाबत संबंधितांकडे कोणतेही पुरावे आढळून न […]
दिंडोरी तालुक्यातील वणी जिल्हा परिषद गटात 100 कोटींपेक्षा जास्त विकासनिधी आणून इतिहास रचलेल्या नामदार नरहरी झिरवाळ यांना स्थानिकांचे मोठे पाठबळ मिळत आहे. वणीतील प्रत्येक रस्त्याला आणि गावांना निधी देत झिरवाळ यांनी सर्वांगीण विकास साधला आहे. या विकास रथाला पुढे नेण्यासाठी झिरवाळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे लागेल, असे प्रतिपादन वणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास […]
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपा टोल नाक्यावर गुरुवारी झालेल्या धडक कारवाईत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व सुपा पोलिसांनी तब्बल 23 कोटी 71 लाख 94 हजार रुपयांचे सोने, चांदी आणि डायमंड जप्त केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हा ऐवज कोषागारात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 9:30 वाजता, पुणे महामार्गावरील सुपा टोल नाक्यावर बीव्हीसी लॉजिस्टिक […]
दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जय शंभुराजे परिवार, महाराष्ट्र राज्य नाशिक विभागाच्या वतीने किल्ले विश्रामगड येथे भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी दीपांच्या प्रकाशात किल्ला विश्रामगड उजळून निघाला, ज्यामुळे उपस्थित शिवप्रेमींना एक अद्वितीय दृश्य अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाला उपस्थित आदित्य शिंदे, एकनाथ करमोडकर, कृष्णा झनकर, भरत झनकर, आणि संकेत ठोसर यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. […]
उत्तर प्रदेशातील अयोध्येत 25 लाखांहून अधिक मातीच्या दिव्यांनी शहर उजळून टाकले असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे.प्रभू श्रीरामाचे मंदीर लाखो दिव्यांच्या उजेडानी सजले आहे.श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. शरयू नदीच्या 55 घाटांवर एकाच वेळी 25 लाख दिव्यांच्या रोषणाईने एक मोठा विक्रम झाला आहे. दीपोत्सव सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत […]
मनमाड शहरापासून काही अंतरावर पानेवाडी जवळ आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली, ज्यात इंधन वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने (MH-15, CC-5523) समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या एका बालकासह त्याच्या आईला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, एमएच-19, ईएच-5568 या क्रमांकाच्या दुचाकीवर सचिन […]
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने यंदा रब्बी हंगामातही केवळ एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. सरकारने २०२३ पासून २०२५-२६ पर्यंत सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येईल. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिकतेवर आधारित ही योजना उपलब्ध असून […]