यवतमाळ : मतदार जनजागृतीसाठी यवतमाळ विधानसभा मतदासंघाच्यावतीने विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील एक हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले होते. यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ व […]
लातूर जिल्ह्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर ठरले मानाचे वारकरीपंढरपूर : वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय […]
नाशिक: विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सकल मराठा परिवार या सामाजिक संघटनेने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीत योग्य उमेदवार निवडण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विविध मार्गांनी प्रबोधन करण्यात येत आहे. सकल मराठा परिवाराच्या वतीने नाशिकमध्ये शाळांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनजागृती रॅली, पथनाट्य, पोस्टर्स, […]
कल्याण : लाडशाखीय वाणी समाज मंडळ, कल्याणतर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्यात समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा आदरपूर्वक गौरव करण्यात आला. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर येथे पार पडलेल्या या वार्षिक सोहळ्यात समाजातील तरुण प्रतिभांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या अध्यक्ष सौ. स्नेहल संदीप देव यांनी […]
नाशिक: शहरातील कालिका मंदिरासमोरील कालिका प्लाझा येथे ‘लेनोरा माईंडट्यून कन्सल्टंट्ज’ या वेलनेस कौशलिंग व थेरपी सेंटरचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता थाटात पार पडले. या प्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक आणि सौ. प्रिया कर्णिक यांच्यासह नामांकित बांधकाम व्यावसायिक श्री. दीपक चंदे व सौ. दीपा चंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सेंटरचे संचालन मानसशास्त्रज्ञ […]
नाशिक – भाविकांचे शहर, औद्योगिक केंद्र, आणि शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या दशकात गुन्हेगारी, ड्रग्जचा विळखा, आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यामुळे नाशिककरांना अडचणीत आणले आहे. नाशिकला सुरक्षित, भयमुक्त, आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन गिते यांनी केले. इंदिरानगरमधील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक […]
नाशिक –“मी नाशिक दत्तक घेणार नाही, पण नाशिकचा विकास मात्र मोठ्या प्रमाणावर घडवणार आहे,” असे ठाम प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवननगर स्टेडियम, नवीन नाशिक येथे ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, येणारी विधानसभा निवडणूक ठरवेल की महाराष्ट्राचा मार्ग […]
दिवाळीच्या सणात नागरिकांच्या खिशाला महागाईचा झटका बसला आहे. आजपासून (१ नोव्हेंबर) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेक व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांवरही आर्थिक भार वाढणार आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसायांवर परिणाम होणार आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत १५६ रुपये, तर […]
नाशिक शहरातील ब्रह्माकुमारी संस्थेच्या पंचवटी सेवा केंद्राचा ५१ वा वर्धापन दिन आणि दीपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्य प्रशासिका वासंती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने या उत्सवाला सुरुवात झाली, यावेळी दिंडोरी येथील नायब तहसीलदार वसंतराव धुमसे, महर्षी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे, आणि पारख […]
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन […]