नाशिकमध्ये नितीन शेट्टीच्या निर्घृण हत्येने खळबळ; पोलिसांनी पाच जणांना अटक

उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर येथे नितीन शंकर शेट्टी (वय ३२) याचा सहा जणांच्या टोळक्याने तलवार आणि कोयत्याने निघृण खून केला. शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर अवघ्या १० तासांत मुंबई नाका पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली. नितीन शेट्टी आणि संशयितांमध्ये सकाळी झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. संशयितांपैकी एकाच्या इडली गाडीला लाथ […]

राहुल नार्वेकर बिनविरोध अध्यक्षपदी; उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीची मागणी

राज्यातील २८८ आमदारांच्या शपथविधीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी महायुतीकडून ॲड. राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून अर्ज न भरल्याने राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, महाविकास […]

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प अंतिम टप्प्यात: खा. राजाभाऊ वाजे यांचा पाठपुरावा फळाला

नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून नव्याने तयार होणारा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी दिल्ली येथे खा. राजाभाऊ वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीवर सविस्तर चर्चा झाली. हा प्रकल्प मागील काही वर्षांपासून रखडला होता, मात्र खा. वाजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्याला […]

अशोका मार्गात एमडी ड्रग्जसह तिघांना अटक; तस्करीचा नवा खुलासा

नाशिकमधील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अशोका मार्ग परिसरात मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा पकडून तीन जणांना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता या परिसरात सापळा रचून २ लाख ९७ हजार पाचशे रुपयांच्या एमडीसह संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात अजय भिका रायकर (३६), मोसिन हानिफ शेख (३६), आणि अल्ताफ पीरण शहा (३५) […]

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजाचा आधारस्तंभ हरपला – उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. दिवंगत पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहिल्यानगर […]

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. […]

कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ..

मुंबई: विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची […]

महायुती सरकारच्या नेतृत्वाचा पेच सुटला..

राज्यात महायुती सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा पेच अखेर सुटला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली असून तेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. आज भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर आशिष शेलार व रवींद्र चव्हाण […]

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानात!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला असून, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरुन भाजप आणि इतर घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, भाजपच्या १३२ जागांवरील विजयामुळे […]

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर राज्यात अजूनही सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीने मिळवलेल्या प्रचंड बहुमतानंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोणाच्या गळ्यात माळ पडणार यावर सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427