राज्यातील २८८ आमदारांच्या शपथविधीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी महायुतीकडून ॲड. राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून अर्ज न भरल्याने राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपद आणि विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी मागणी केली आहे. ९ डिसेंबरला होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसह उपाध्यक्षपदाच्या वाटाघाटींवर सर्वांचे लक्ष आहे.