नाशिकमध्ये नितीन शेट्टीच्या निर्घृण हत्येने खळबळ; पोलिसांनी पाच जणांना अटक

उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर येथे नितीन शंकर शेट्टी (वय ३२) याचा सहा जणांच्या टोळक्याने तलवार आणि कोयत्याने निघृण खून केला. शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर अवघ्या १० तासांत मुंबई नाका पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली. नितीन शेट्टी आणि संशयितांमध्ये सकाळी झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. संशयितांपैकी एकाच्या इडली गाडीला लाथ […]

नाशिक बसस्थानकात ई-बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोन जखमी

शिर्डीहून नाशिकला आलेल्या ई-बसने (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) महामार्ग बसस्थानकावर फलाटाजवळ अचानक नियंत्रण गमावल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव अंजली थट्टीकोंडा-नागार्जुन (२३, रा. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असून, त्या पती मुपाल्ला नागार्जुन (३०) यांच्यासोबत चौकशी कक्षाजवळ चालत असताना बसच्या धडकेत सापडल्या. या […]

अशोका मार्गात एमडी ड्रग्जसह तिघांना अटक; तस्करीचा नवा खुलासा

नाशिकमधील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अशोका मार्ग परिसरात मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा पकडून तीन जणांना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता या परिसरात सापळा रचून २ लाख ९७ हजार पाचशे रुपयांच्या एमडीसह संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात अजय भिका रायकर (३६), मोसिन हानिफ शेख (३६), आणि अल्ताफ पीरण शहा (३५) […]

कपालेश्वर मंदिरात दानपेटी चोरी, मंदिरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नाशिकमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी आता मंदिरांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी चोरीला गेली आहे. हे घडलं दुपारच्या वेळी, जेव्हा रस्त्यावर वर्दळ असतानाही चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून तेथील रक्कम लांबवली. मंदिरांमध्ये चोरीचे प्रकार वाढले असून, त्यात कधी दानपेटी फोडून रक्कम लांबवली जाते, तर कधी थेट […]

मनमाडमध्ये दारूच्या नशेत सहा दुचाकी जळाल्या; आरोपीला अटक…

मनमाड शहरातील विवेकानंद नगरसह विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत सहा दुचाकी पेटवण्याच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, पोलिसांनी तात्काळ तपास करून सागर जगताप नावाच्या तरुणाला अटक केली आहे. दारूच्या नशेत सागर जगतापने घराबाहेर उभ्या असलेल्या सहा मोटारसायकली पेटवल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. मनमाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल […]

दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय बालकाचा मृत्यू: पाचवा बळी

तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय अनिल करमसिंग तडवी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातील हा परिसरातील पाचवा बळी असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कालीबेल येथील तडवी कुटुंबातील अनिल हा दलेलपूरजवळील शेतात वावरत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात अनिलच्या डोक्याला आणि तोंडाला […]

शासकीय नोकरीचे आमिष: वडिलांची ८.३५ लाखांची फसवणूक

मुलाच्या शासकीय नोकरीसाठी वणवण करणाऱ्या एका वडिलांना तीन ठगांनी बनावट जॉईनिंग लेटर देऊन तब्बल ८ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हेमराज गंगाराम गायकवाड (४८, रा. ताहाराबाद, जि. नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. गायकवाड यांचा मुलगा एमएसडब्ल्यू आणि डी. एड शिक्षण पूर्ण करूनही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. […]

अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा युनिट २ ची धडाकेबाज कामगिरी

अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सनी उर्फ मोंटी रमेश दळवी (34) याला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे व त्यांच्या पथकाने महाकाली चौक, सिडको येथे संशयिताचा पाठलाग […]

नाशिक रोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: हरवलेले 130 मोबाईल परत, किंमत 19.45 लाख

नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या दहशतवाद विरोधी पथकाने हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याचे मोठे यश संपादन केले आहे. सी.ई.आय.आर पोर्टलच्या सहाय्याने 2021 पासून हरविलेले एकूण 130 मोबाईल फोन, अंदाजे किंमत 19 लाख 45 हजार रुपये शोधून काढले आणि मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 श्रीमती मोनिका […]

नाशिक बसस्थानकात सोन्याची पोत लंपास; चोरट्यांची चलाखी

नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरली. शनिवारी (३० नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली असून, यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरेश तुकाराम रणसशिंग (रा. अंबाजीनगर, आरटीओ कॉर्नर, पंचवटी) हे आपल्या पत्नीसोबत सकाळी ११ च्या सुमारास महामार्ग बसस्थानकात आले होते. नाशिक-सोलापूर बसमध्ये बसत असताना अचानक गर्दी […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427