नाशिकमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी आता मंदिरांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी चोरीला गेली आहे. हे घडलं दुपारच्या वेळी, जेव्हा रस्त्यावर वर्दळ असतानाही चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून तेथील रक्कम लांबवली.
मंदिरांमध्ये चोरीचे प्रकार वाढले असून, त्यात कधी दानपेटी फोडून रक्कम लांबवली जाते, तर कधी थेट दानपेटीच चोरून नेली जाते. यासोबतच मंदिरातील पितळी घंटा, देवावरची दागिने देखील चोरीला जात असल्याचे समोर आले आहे.
चोरट्यांच्या या कृत्यामुळे नाशिकमधील मंदिरांमध्ये सुरक्षेची चिंता वाढली आहे, आणि यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.