लाडशाखीय वाणी समाज मंडळतर्फे गुणी विद्यार्थी व ज्येष्ठांचा गौरव सोहळा संपन्न

कल्याण : लाडशाखीय वाणी समाज मंडळ, कल्याणतर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्यात समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा आदरपूर्वक गौरव करण्यात आला. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर येथे पार पडलेल्या या वार्षिक सोहळ्यात समाजातील तरुण प्रतिभांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या अध्यक्ष सौ. स्नेहल संदीप देव यांनी […]

नाशिकमध्ये ब्रह्माकुमारींच्या दीवाळी उत्सवात विश्वकल्याणाचा संदेश: “मनात सदैव शुभभावना ठेवा” – वासंती दीदींचे प्रेरणादायी विचार

नाशिकमध्ये ब्रह्माकुमारी मेरी सेवा केंद्रात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी उपस्थितांना आशीर्वाद देत, जीवनात सदैव शुभभावना ठेवण्याचे महत्व स्पष्ट केले. “आपण इतरांना जे देतो, तेच आपल्याला परत मिळते,” असे सांगून दीदीजींनी प्रत्येकाने शुभेच्छा आणि शुभभावनेचे बीज मनात रुजवावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा […]

पंचवटी सेवा केंद्राचा ५१ वा वर्धापन दिन: दीपावली उत्सवात आध्यात्मिक तेजाचा प्रकाश

नाशिक शहरातील ब्रह्माकुमारी संस्थेच्या पंचवटी सेवा केंद्राचा ५१ वा वर्धापन दिन आणि दीपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्य प्रशासिका वासंती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने या उत्सवाला सुरुवात झाली, यावेळी दिंडोरी येथील नायब तहसीलदार वसंतराव धुमसे, महर्षी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पगारे, आणि पारख […]

संजना जगताप हिला अंतर विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत ‘ बेस्ट लिफ्टर ऑफ द टूर्नामेंट ‘ ‘किताब….

नाशिकरोड :- लोकनेते रामदास पाटील महाविद्यालय, राहुरी येथे झालेल्या अंतर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा (मुली) या स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या आर.एन.सी.आर्ट्स जे.डी.बी. कॉमर्स एन.एस.सी.सायन्स नाशिकरोड महाविद्यालयाच्या संजना जगताप हिची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तसेच तिला या स्पर्धेत बेस्ट लिफ्टर ऑफ द टूर्नामेंट हा किताब सुद्धा मिळाला. त्याबद्दल संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, विभागीय […]

विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत शिवम पडुसकर यास दुहेरी सुवर्णपदक…

नाशिकरोड :- मीनाताई ठाकरे स्टेडियम , हिरावाडी, पंचवटी येथे मोठ्या उत्साहाने पार पडलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत धुळे,जळगाव,नंदुरबार,नासिक येथील खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान बिटको कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला शिवम पडुसकर याने लांब उडी व तिहेरी उडी या दोन्ही क्रीडा प्रकारात […]

शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुष्का गोसावी ला सुवर्णपदक….

नाशिकरोड :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व जय भवानी व्यायाम शाळा, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय जिल्हास्तर वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान(बिटको) कनिष्ठ महाविद्यालय मध्ये इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या कु.अनुष्का गोसावी हिने क्लीन आणि जर्क मध्ये ४४ किलो वजन उचलून स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त […]

विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत कनिष्ठ बिटको महाविद्यालयाच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी..

नाशिकरोड :- केंद्र व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जलतरण तलाव जळगाव येथे १९ वर्षा खालील मुलांच्या व मुलींच्या विभागीय शालेय जलतरण स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.सदर स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य व विज्ञान (बिटको) कनिष्ठ महाविद्यालय नासिक रोडच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे […]

अमरकुमार प्रस्तुत आशा मेलोडी वतीने रविवार दि.१३ ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट गीतांवर आधारित ‘ रंग बरसे ‘ कार्यक्रम….

नाशिकरोड :- नाशिकरोड येथील जय भवानी रोड येथील आशा मेलोडी संचलित अमरकुमार प्रस्तुत महानायक अमिताभ बच्चन यांच्या सदाबहार हिंदी चित्रपट गीतावर आधारित हृदयस्पर्शी चित्रपट गीतांचे रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘ रंग बरसे ‘ चे शालिमार येथील प सा. नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमात स्वतः अमरकुमार व गायक संजय रासकर, […]

अभिनेता गोविंदा जखमी; बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटली… नेमकं घडलं काय

अभिनेता गोविंदा यांना चुकून गोळी लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती हॅास्पिटल प्रशासनाने दिली आहे. गोविंदाच्या मॅनेजर शाही सिन्हा यांनी सांगितले की, गोविंदा कोलकात्याला पहाटे जाण्याच्या तयारीत असताना कपाटात बंदूक ठेवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडली आणि चुकून गोळी सुटली गोविंदानेही याबाबत स्पष्टीकरण […]

बिटको महाविद्यालयातील इंद्रनील जाधवचे मल्लखांब स्पर्धेत यश…..

नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंद्रनील जाधव याने नाशिक येथील यशवंत व्यायाम शाळेत झालेल्या शालेय जिल्हास्तर मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच पार्थ सरोदे याने जिजामाता इंटरनॅशनल तरणतलाव नाशिकरोड येथे झालेल्या ५० मीटर फ्री स्टाईल ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व १०० मीटर […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427