मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, या पदाच्या मुलाखती दिनांक 05 व 06 डिसेंबर, 2024 रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा संवर्गाचा निकाल जाहीर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचारी […]
मुंबई, दि. 7 :- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम् व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आशा पुन्हा जागवल्या आहेत. प्रस्तावित २३२ किमीचा नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वेमार्ग कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी नव्या सरकारकडून निधी व सुस्पष्ट निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, सरकारने नाशिक-सिन्नर-शिर्डी मार्गाचा पर्याय सुचवला होता, परंतु तिन्ही जिल्ह्यांतून झालेल्या तीव्र नाराजीमुळे पूर्वीचाच मार्ग […]
राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने राबवलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असून त्यात मानधन वाढीची शक्यता आहे. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योजनेबाबत स्पष्टता देत महायुती सरकारच्या संकल्पपत्रातील आश्वासन पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे. मुनगंटीवार यांनी नमूद केले की, वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कुटुंबातील महिलांना तसेच कर भरणाऱ्या महिलांना […]
पुणे वृत्त :- पुण्यातील स्वराज्य भवन येथे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराजांची भेट घेऊन नाशिक पूर्व विधानसभा निवडणुकीत विजयाचे आशीर्वाद घेतले.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी देऊन जनसेवेची संधी उपलब्ध करून दिली,याबद्दल मी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य पक्षाच्या सर्व […]
राज्यात निवडणुकीचा माहोल तापला असताना, पुण्याच्या सहकार नगर भागात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी 138 कोटी रुपयांचे सोने जप्त केले. आज सकाळी पुणे पोलिसांनी एमएच ०२ ईआर ८११२ या कंटेनरची तपासणी केली असता, पांढऱ्या रंगाच्या कंटेनरमध्ये सोन्याचे मोठ्या प्रमाणात साठा आढळला. जप्त केलेले हे सोने एका खासगी लॉजिस्टिक कंपनीच्या कंटेनरमधून वाहून नेले जात होते, ज्याची माहिती आयकर […]
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. २०२४ मधील बोर्ड परीक्षांच्या तारखा जवळपास निश्चित झाल्या असून, येत्या १५ दिवसांत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२४ पासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या शाळा व […]
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) सध्या ऑक्टोबर २०२४ च्या परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, जुने आणि नव्या अभ्यासक्रमाच्या घोळामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. पत्रकारीता, विज्ञान, आणि इतर शाखांमध्ये परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अपेक्षित विषय निवडता येत नसल्याने मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. विद्यापीठाने परीक्षा अर्जासाठी लिंक उघडली असली तरी संबंधित शाखांचे विषय […]
रमेश मुसूडगे (पत्रकार, पुणे ) यांसकडून ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे ही संस्था गेली पाच वर्षापासून वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तूविशारद, लोलक विशारद,अंकशास्त्र, वास्तुभूषण, वास्तु रत्न, संसार सुखाचा कसा करावा या वर्गाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेत असून दीड हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या वर्गाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. या सर्व प्रशिक्षण […]
पुणे :- 15 सप्टेंबर 2024, रविवार रोजी पिंपरी चिंचवड येथील शिवाजी पार्क संभाजीनगरमधील हर्षधन विला येथे कलाकारांच्या हिताचे मुद्दे आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महिला कलाकारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर तसेच कलाकारांच्या उपजीविकेच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झाली. या बैठकीचा मुख्य उद्देश्य सर्व कलाकारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांना […]