महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आशा पुन्हा जागवल्या आहेत. प्रस्तावित २३२ किमीचा नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वेमार्ग कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी नव्या सरकारकडून निधी व सुस्पष्ट निर्णय अपेक्षित आहे.
दरम्यान, सरकारने नाशिक-सिन्नर-शिर्डी मार्गाचा पर्याय सुचवला होता, परंतु तिन्ही जिल्ह्यांतून झालेल्या तीव्र नाराजीमुळे पूर्वीचाच मार्ग कायम ठेवण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प केवळ तीन जिल्ह्यांमधील दळणवळण सुधारण्यासाठी नव्हे, तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.