अभिनेता गोविंदा यांना चुकून गोळी लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती हॅास्पिटल प्रशासनाने दिली आहे. गोविंदाच्या मॅनेजर शाही सिन्हा यांनी सांगितले की, गोविंदा कोलकात्याला पहाटे जाण्याच्या तयारीत असताना कपाटात बंदूक ठेवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडली आणि चुकून गोळी सुटली
गोविंदानेही याबाबत स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि गुरुंच्या कृपेमुळे आपली सुरक्षा झाल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, “माझ्या पायाला गोळी लागली होती, ती आता काढण्यात आलेली आहे.”