दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी AIMIM पक्षाच्या रॅलीदरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील “छत्रपती संभाजी महाराज” यांचे नाव असलेल्या फलकांवर काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील या रॅलीतील जमावाने केलेल्या या कृत्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाने या प्रकाराविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, या प्रकारामुळे सामाजिक शांतता बिघडण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संजय फडोळ, योगेश नाटकर, अक्षय अनवट, राकेश धोंडगे, विक्की ढोले, अमोल गुणवंत, ओम निकम, सागर कातड, गौरव गाजरे, प्रितेश रायते, आणि वैभव वडजे हे कार्यकर्ते उपस्थित होते.