राज्यातील २८८ आमदारांच्या शपथविधीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी महायुतीकडून ॲड. राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून अर्ज न भरल्याने राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, महाविकास […]
नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून नव्याने तयार होणारा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी दिल्ली येथे खा. राजाभाऊ वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीवर सविस्तर चर्चा झाली. हा प्रकल्प मागील काही वर्षांपासून रखडला होता, मात्र खा. वाजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्याला […]
मुंबई : राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. दिवंगत पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहिल्यानगर […]
मुंबई : ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. […]
मुंबई, दि. 7 :- विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम् व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.
मुंबई: विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची […]
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात राज्यपाल […]
आज, 6 डिसेंबर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भेंडाळा ग्रामपंचायत, जि.प. प्राथमिक शाळा आणि रेणुका अंगणवाडीत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रामपंचायत उपक्रमाने दिला एकात्मतेचा संदेशकार्यक्रमात ग्रामपंचायत उपसरपंच शरद सुरासे, सदस्य ज्ञानेश्वर सुरासे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंदा सुरासे, बळी शिंदे, […]
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सचिव प्रवीण पुरो, माहिती व […]
राज्यात महायुती सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा पेच अखेर सुटला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली असून तेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. आज भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर आशिष शेलार व रवींद्र चव्हाण […]