नाशिक :- नाशिक, 17 सप्टेंबर 2024 – आज नाशिकमध्ये गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला. अनंत चतुर्दशी निमित्त शहरातील विविध मंडळांनी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगीत फुलांच्या वर्षावात गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या. भक्तांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळांनी आकर्षक […]
सिडकोतील आरटीआय कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावर दोन ते अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. आरोपी अंकुश शेवाळे यांनी मानसिक त्रास देणाऱ्या जाधव यांचा खात्मा करण्यासाठी सराईत गुंड मयूर बेद याला भाडोत्री गोळीबार घडवण्यास सांगितले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके […]
कांद्याच्या दरात झपाट्यानं वाढ झाली असून, यामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात मूल्यात 550 डॉलर कपात केल्यानंतर निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर कमी केले आहे. यामुळे कांद्याच्या भावात 400 ते 500 रुपयांची वाढ झालेली आहे. आता, वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसाठी कांदा खरेदी करणे […]
मुंबई : एसटी बस प्रवासातील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एसटी प्रशासनाने नवीन यंत्रणा सुरू केली आहे. प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणीसाठी प्रवाशांना थेट आगार प्रमुखांना फोन करून संपर्क साधता येणार आहे. आता प्रत्येक एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित आगाराचे प्रमुख, स्थानक प्रमुख, आणि कार्यशाळा अधीक्षक यांचे दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित केले जातील. हे क्रमांक बसमध्ये दिलेल्या सूचनांसोबत […]
नाशिकरोड :- ” नाशिकरोड महाविद्यालयाशी विविध नामवंत विद्यार्थ्यांचा एक अनुबंध निर्माण झाला आहे. शिक्षण महर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त पवित्र स्मृतींना वदंन करून सरांनी शिक्षण क्षेत्राचा विस्तार केला आहे.विद्यार्थी देवो भव हे ब्रीद सातत्याने जपत आलेले आहे. नाशिकरोड कॉलेज एक कम्युनिटी कॉलेज आहे. शिक्षणासोबत कुशल नेतृत्वाची, संस्काराची कार्यशाळा निर्माण केली […]
नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात संस्थेचे माजी सचिव व महासंचालक तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ञ स्व. डॉ. मो. स. गोसावी यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी -एअर विंग व विद्यार्थी कल्याण मंडळ वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अनिल कुमार […]
नाशिक:- द्वारका परिसरातील शंकर नगर जवळील त्रिंगानिया फॅक्टरीच्या बाजूला स्लीपर लक्झरी बसेसमध्ये चालणाऱ्या अवैध सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी नमो विचार मंचचे कार्यकारी अध्यक्ष चंदन पवार यांनी केली आहे. परिसरातील जवळपास 20 ते 25 बसेस रस्त्याच्या दुतर्फा अवैध पार्किंग केल्या जातात, ज्यामध्ये रात्रीच्या वेळेस अनेक कपल्स येऊन शारीरिक संबंध ठेवत असतात. या अवैध धंद्यात बसेसचे […]
नाशिक :- नाशिक पोलिस आयुक्तालय व व नाशिक मनपा शिक्षण विभाग यांचें संयुक्तविद्यमाने नाशिक मनपा शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक , शासकीय , केंद्रीय विद्यालय या 23 शाळांमध्ये “स्टुडंट्स पोलिस कॅडेट् ” उपक्रम राबविण्यात येत आहे . हा उपक्रम देशभर राबवला जात आहे महाराष्ट्रातील सर्व शासकीय शाळांमध्ये राबवला जात असुन यातून विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनातच नीतिमूल्ये रुजावी […]
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता ? नाशिक :- अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने (दि. १७ सप्टेंबर) नाशिकमध्ये गणेश विसर्जनाची मुख्य मिरवणूक सकाळी ११ वाजता भद्रकालीतील वाकडी बारव येथून सुरू होणार आहे. या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कार्यालयाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. विशेष शाखेमार्फतही अतिरिक्त बंदोबस्ताची आखणी करण्यात येत […]
नाशिक, ११ सप्टेंबर २०२४: गाडेकर कुटुंबीयांनी सालाबादप्रमाणे यंदाही श्री गणेश व गौरीच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. श्री गणेशाच्या आगमनाबरोबरच, गौरी मातेचे आगमन आणि तिचे पवित्र वास्तव्य गाडेकर कुटुंबाच्या निवासस्थानी होत आहे. या मंगलमय आणि पवित्र प्रसंगाचे दर्शन घेण्यासाठी गाडेकर परिवाराने आपल्या सर्व परिचित, मित्रमंडळींना सस्नेह निमंत्रण दिले आहे. गाडेकर परिवाराने दिलेल्या […]