राज्यात निवडणुकीचा माहोल तापला असताना, पुण्याच्या सहकार नगर भागात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी 138 कोटी रुपयांचे सोने जप्त केले. आज सकाळी पुणे पोलिसांनी एमएच ०२ ईआर ८११२ या कंटेनरची तपासणी केली असता, पांढऱ्या रंगाच्या कंटेनरमध्ये सोन्याचे मोठ्या प्रमाणात साठा आढळला. जप्त केलेले हे सोने एका खासगी लॉजिस्टिक कंपनीच्या कंटेनरमधून वाहून नेले जात होते, ज्याची माहिती आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी वाढल्याने, हे सोने व्यापाऱ्यांकडे जात होते का याबाबत पोलिस तपास करत आहेत..