नाशिकरोड :- केंद्र व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जलतरण तलाव जळगाव येथे १९ वर्षा खालील मुलांच्या व मुलींच्या विभागीय शालेय जलतरण स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.सदर स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य व विज्ञान (बिटको) कनिष्ठ महाविद्यालय नासिक रोडच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून यश संपादन केले . या स्पर्धेमध्ये कु.पार्थ सरोदे याने ५० मिटर ब्रेस्टस्ट्रोक व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक ह्या दोन क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू स्पर्धेमध्ये मुलांच्या गटामध्ये द्वितीय स्थान मिळवले तसेच कु.मनस्वी खर्डे हिने १०० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर बटरफ्लाय या दोन क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून मुलींच्या गटामध्ये द्वितीय स्थान मिळवले. सदर दोन्ही जलतरणपटूंची अमरावती येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तर जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशस्वी खेळाडूंचे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महेश थेटे यांचे मार्गदर्शन लाभले.