नाशिकरोड :- ” वाणिज्य शाखेचा प्रामुख्याने व्यवसाय, व्यापार, अर्थ, कर्ज, वित्त याच्याशी महत्त्वपूर्ण संबंधित आहे. वाणिज्य शाखेत मार्केटिंग, कम्युनिकेशन, मॅनेजमेंट, बँकिंग, कॉस्टिंग, फायनान्स , ऑडिटिंग,अकाउंटन्सी, गुंतवणूक, विमा अधिक क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. बारावीनंतर बी बी ए, आय सी ए आय, क्षेत्रातीलमॅनेजमेंट स्टडीज, सी ए क्षेत्रातील आयसीएस अधिक क्षेत्रात करिअर करता येते. तसेच आयबीपीएस तर्फे घेण्यात येणाऱ्या बँकिंग परीक्षा स्टेट बँक,आर बी आय अधिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये संधी आहे, कॉमर्स मध्ये विषय कुठला निवडावा उदाहरणार्थ कॉस्टिंग,लॉ विषय घेऊन वाणिज्य क्षेत्रात करिअर करता येते त्यासाठी संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे , ” असे प्रा. डॉ. करुणा कुशारे यांनी केले .
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे आयोजित वाणिज्य मंडळ उद्घाटन प्रसंगी व ‘ करियर गाईडन्स ‘ या विषयावरील व्याख्यानात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर व्याख्यात्या प्रा. डॉ. करुणा कुशारे यासह कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, प्रा. लता चिकोडे, संयोजिका शालिनी शेळके, अनुराधा वाघ आदी उपस्थित होते.
प्रारंभी उद्योजकीय क्षेत्रातील कोहिनूर रतनजी टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुनीता नेमाडे यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रणाली पाथरे यांनी करून दिला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिनी शेळके यांनी केले तर आभार शुभांगी पाटील यांनी मानले. तांत्रिक सहाय्य राहुल पाटील यांनी सांभाळले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीव आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.