नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात भारतीय वायुसेना स्थापना दिवस निमित्त सीएनपी नाशिक येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी आय एस एफ ) यांच्यावतीने आग प्रतिबंधकासाठी आवश्यक अग्निशामक यंत्रे कसे वापरावे हाताळण्याचे प्रक्रिया याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मिळाले. निरीक्षक श्री संजीव कुमार, एस. के. झा, सहाय्यक निरीक्षक रहाते, हेड कॉन्स्टेबल, फायर कॉन्स्टेबल अशी सर्व टीम यांनी विद्यार्थ्यांना आगीचे प्रकार, वर्गीकरण व प्रतिबंधकासाठी आवश्यक अग्निशामक यंत्र आदीं बाबत माहिती देऊन यात प्रामुख्याने ज्वलनशील द्रव्यांचा समावेश असलेल्या आगीचा सामना करण्यासाठी व विद्युत आग विझवण्यासाठी यंत्रांचे सील तोडून पिन खेचणे कसे हाताळावे सविस्तर प्रशिक्षण दिले . याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, डॉ.अनिलकुमार पठारे, एनसीसी अधिकारी डॉ. विजय सुकटे यासह प्राध्यापक शिक्षक, आर्मी व एअरविंगचे विद्यार्थी तसेच ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.