नाशिक – भाविकांचे शहर, औद्योगिक केंद्र, आणि शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या दशकात गुन्हेगारी, ड्रग्जचा विळखा, आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यामुळे नाशिककरांना अडचणीत आणले आहे. नाशिकला सुरक्षित, भयमुक्त, आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन गिते यांनी केले. इंदिरानगरमधील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गिते म्हणाले की, “शहरात विविध क्षेत्रांमध्ये घट झाली असून, केंद्र, राज्य आणि महापालिका ट्रीपल इंजिनचे सरकार असूनही विकासाची अभाव जाणवत आहे.” नाशिकच्या विकासासाठी आणि तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी गिते यांनी ज्येष्ठ नागरिकांना सजग होण्याचे आवाहन केले.