मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेकडून नवदुर्गा पुरस्कार सोहळा संपन्न

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक:- दिनांक ०६/१०/२०२४ रोजी पवार ग्रीन स्पेसेस, के. के. वाघ कॉलेज समोर, आडगाव नाका, नाशिक येथे नवदुर्गा पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि दुर्गामातेच्या पूजनाने झाली.

या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पो. इन्स्पेक्टर महेंद्र चव्हाण, कृष्णा मरकड, संगिता दिलीप फडोळ, आरती जैन, डॉ. आशा ताई पाटील, अरविंद सोनवणे, आणि ज्योती केदारे उपस्थित होते. मान्यवरांचे सत्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा शिंपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी, फ्रेम सर्टिफिकेट, फेटा, ओटी भरण आणि नाश्त्याचे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रचना चिंतावार आणि ॲडव्होकेट विनया नागरे यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगतेला राष्ट्रगीत झाले आणि संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा शिंपी यांनी सर्व प्रमुख अतिथी आणि नवदुर्गांचा आभार मानला.

पुरस्कार्थींची नावे: डॉ. मनोरमा पाटील, विशाखा खैरनार, प्रियांका ढोमने, आशा मुठाळ, सोनाली थोरात, कविता पाटील, सुचिता भालेराव, हेमलता वानखेडे, ॲडव्होकेट सोनाली सूर्यवंशी/सोनवणे, दिपाली नागपुरे, पूनम सावन देवरे, ॲडव्होकेट सोनल खैरनार, अनु प्रविण राणा, मनिषा कोकरे, सविता नरेंद्र आहिरे, सुनिता पाठक, डॉ. अश्विनी दाते, रिंकू पाटील, स्मिता आहिरे, तनुजा गुळवी, डॉ. कांचन वखारे, नंदा डेरे, चित्रा गायकवाड, विद्या शहाने, कल्पना भालेराव, वैशाली वाघ, मंजिरी सरोदे, योगिता बागुल, तक्षशिला निकाळे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427