डॉ. विजय गवळीच्या आक्षेपार्ह पोस्टवर संभाजी ब्रिगेडचा निषेध

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- नाशिकच्या गणेश चौक सिडको येथील आयुर्वेदिक वैद्य डॉ. विजय गवळी यांनी सोशल मीडियावर मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या मुद्द्यातील भूमिका घेण्यास नकार दिला, तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य मुसलमान असल्याचा उल्लेख केला. या वक्तव्यामुळे संभाजी ब्रिगेडने तीव्र निषेध व्यक्त करत, डॉ. गवळीवर काळी शाही टाकली.

यामुळे, डॉ. गवळीने व्हिडीओद्वारे माफी मागितली आणि भविष्यामध्ये कोणाच्या भावना दुखवणारी भूमिका घेणार नाही असे आश्वासन दिले. संभाजी ब्रिगेडने देखील लोकांना संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले, तसेच समाजात गैरसमज आणि विकृतीला बळ देण्याचे काम काही प्रवृत्तींना करणे योग्य नाही, असे स्पष्ट केले.
यावेळी मराठा क्रांतीमोर्चाच्या समन्वयक ऍड. स्वप्नाताई राऊत,संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण नाना वाघ, जिल्हाप्रमुख शरद लभडे, महानगर प्रमुख प्रा. प्रफुल्ल वाघ,अनिल आहेर,विकी गायधनी,बळीराम घडवजे,नितीन काळे,निलेश गायकवाड, गणेश पाटील,रवींद्र लोखंडे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427