सिडकोतील आरटीआय कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावर दोन ते अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. आरोपी अंकुश शेवाळे यांनी मानसिक त्रास देणाऱ्या जाधव यांचा खात्मा करण्यासाठी सराईत गुंड मयूर बेद याला भाडोत्री गोळीबार घडवण्यास सांगितले होते.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात गुंडाविरोधी पथकाने सखोल तपास सुरु केला. या तपासात 600 हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान, पथकाला मुख्य ‘लिड’ म्हणून आकाश सूर्यतळ याचे नाव मिळाले. त्याने कारागृहातील श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या आणि सनी पगारे उर्फ टाक्या यांची नावे दिली.
यानंतर या दोघांनाही ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडून मयूर बेद याचे नाव उघड झाले. पथकाने त्याच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी 2022 मध्ये उपेंद्रनगर परिसरात रात्री 11 वाजता जाधव यांच्यावर गोळीबार केला. न्यायालयाने मयूर बेद याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.