नाशिकरोड :- लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झालेल्या टेबल टेनिस आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या आर.एन.सी.आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स, एन.एस.सी.सायन्स नाशिकरोड महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विजयी पद पटकावले तसेच मुलींच्या संघाने उपविजेते पद पटकावले . मुलांच्या संघाने अंतिम फेरीत के. के. वाघ इंजीनियरिंग या संघाला 3 -1 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले तसेच मुलींच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात अंतिम फेरीत के. बी. टी. इंजीनियरिंगच्या संघाबरोबर 2 – 3 पराभूत होऊन उपविजेते पद त्यामधून लोवित चांदुरकर, अन्वय पवार, टीना पाटोळे, तन्वी पोरजे या विद्यार्थ्यांची आंतरविभागीय टेबल टेनिस स्पर्धा, पुणे येथे निवड झालेली आहे. संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी तसेच व्यवस्थापन विभाग प्रमुख शैलेश गोसावी, प्राचार्य डॉ.मंजुषा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच तिला मार्गदर्शक प्रा.धनंजय बर्वे आणि प्रा.महेश थेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या