अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सनी उर्फ मोंटी रमेश दळवी (34) याला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे.
पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे व त्यांच्या पथकाने महाकाली चौक, सिडको येथे संशयिताचा पाठलाग करत अटक केली.
आरोपीला अंबड पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कारवाई गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.