दिंडोरी तालुक्यातील वणी जिल्हा परिषद गटात 100 कोटींपेक्षा जास्त विकासनिधी आणून इतिहास रचलेल्या नामदार नरहरी झिरवाळ यांना स्थानिकांचे मोठे पाठबळ मिळत आहे. वणीतील प्रत्येक रस्त्याला आणि गावांना निधी देत झिरवाळ यांनी सर्वांगीण विकास साधला आहे. या विकास रथाला पुढे नेण्यासाठी झिरवाळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे लागेल, असे प्रतिपादन वणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास कड यांनी केले.
झिरवाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीला वणीचे सरपंच मधुकर भरसठ यांनीही उपस्थित राहून झिरवाळ यांना आपला पाठिंबा जाहीर केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मधुकर भरसठ होते, तर विलास कड यांनी झिरवाळ यांच्या विकासकार्याची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी सांगितले की, वणी परिसरातील एकही गाव असे नाही, जिथे झिरवाळ यांनी निधी दिला नाही. वैद्यकीय सेवांमध्येही झिरवाळ यांनी गरीबांसाठी भरीव सहकार्य केले आहे.
यावेळी जेष्ठ नेते मनोज शर्मा यांनी मताधिक्याने झिरवाळ यांना निवडून आणून “विकासाची दिवाळी” साजरी करण्याचे आवाहन केले. तसेच, “नरहरी झिरवाळ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” या घोषणा देत स्थानिकांनी एकता दर्शवली.
सभेला अंध अपंग संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनीही हजेरी लावली आणि अपंग बांधवांचा झिरवाळ यांना पूर्ण पाठिंबा राहील, असे सांगितले. या सभेत राष्ट्रीय सेवक संघाचे सुरेश वर्मा, वसंत कावळे, जे. डी. केदार, अशोकमामा भालेराव यांसारखे मान्यवर उपस्थित होते. झिरवाळ यांच्या कामगिरीवर प्रशंसा करत, सर्वांनी घड्याळाला मतदान करण्याचा निर्धार केला.