स्लीपर लक्झरी बसेसमधील सेक्स रॅकेट बंद करण्याची मागणी – नमो विचार मंचचे चंदन पवार

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक:- द्वारका परिसरातील शंकर नगर जवळील त्रिंगानिया फॅक्टरीच्या बाजूला स्लीपर लक्झरी बसेसमध्ये चालणाऱ्या अवैध सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी नमो विचार मंचचे कार्यकारी अध्यक्ष चंदन पवार यांनी केली आहे. परिसरातील जवळपास 20 ते 25 बसेस रस्त्याच्या दुतर्फा अवैध पार्किंग केल्या जातात, ज्यामध्ये रात्रीच्या वेळेस अनेक कपल्स येऊन शारीरिक संबंध ठेवत असतात. या अवैध धंद्यात बसेसचे ड्रायव्हर आणि हेल्पर सहभागी असून, प्रत्येक कपलकडून 50 ते 100 रुपये घेण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

चंदन पवार यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना निवेदन देऊन या अनैतिक प्रकारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या वेळी नमो विचार मंचचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब बोडकेही उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427