नांदेड :- 12 ते 14 सप्टेंबर 2024 दरम्यान नांदेड येथील क्रीडा संकुल, यशवंत महाविद्यालयात आयोजित 22 वी सब-ज्युनिअर आणि 3 री ऑल इंडिया सीनियर राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन समारंभाला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. नरेंद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रारंभ करण्यात आला.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये पंजाब, जम्मू कश्मीर, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र यांसारख्या विविध राज्यांतून जवळपास 300 खेळाडू नांदेड नगरीमध्ये दाखल झाले आहेत.
समारंभात राष्ट्रीय जम्परोप संघटनेचे महासचिव साजाद खान, टोकियो ओलंपिक निरीक्षक अशोक दूधारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपिले, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे, पंचप्रमुख नथुराम जट, महाराष्ट्र संघटनेचे सचिव दीपक निकम, यशवंत महाविद्यालयाचे रजिस्टर संदीप पाटील, प्रा. डॉ. रमेश नांदेडकर, प्राचार्य डॉ. बालाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. राहुल वाघमारे यांनी प्रास्ताविक केले, तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राहुल चंदेल, आकाश मुगल, शिवाजी जाधव, प्रियंका गायकवाड, आकाश क्षीरसागर, किरण नागरे, वैजनाथ नावंदे, राजू वाकडे, गंगासागर गोईन, वनश्री गाडगीळ, कन्हैया उमाकांत इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.