भंडारा :- भंडारा पोलीस ठाणे जि. भंडारा पोलीसांनी १६७.१०० किलो ग्रॅम वजनाचा २५,०६,५००/- रू. किंमतीचा गांजा जप्त करून, गुरनं. ८७३/२०२४ एन.डी.पी. एस. १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (II), २९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दिनांक ०६/०९/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोअं/२४३२ बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, भंडारा पोलीस ठाणे जि. भंडारा कडील गुरनं.८७३/२०२४ एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (सस), २९ प्रमाणे दिनांक ०६/०९/२०२४ रोजी ०५:४५ वाजता दाखल आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे १) तुषार संतोष भोसले वय-२६ वर्षे रा. फ्लॅट नं. ११, साईरत्न अपार्टमेंट गोपालनगर, अमृतधाम, नाशिक, २) सुरज रामु शिंदे, वय-२७ वर्षे, रा. फ्लॅट नं १०३, वक्रतुंड हाईटस, ध्रुवनगर, महाराणा प्रताप गार्डन, गंगापुर रोड, नाशिक हे गुन्हा दाखल झाल्याने, सदर आरोपी नाशिक येथुन पळुन जाण्याच्या तयारीत असल्याची
बातमी मिळाली. सदर आरोपी यांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्वतःचे कौशल्य वापरून शिताफीने पासपोर्ट व गुन्हयात वापरलेल्या Xuv 700 या चारचाकी वाहना सह ताब्यात घेवुन, पुढील कारवाई करीता भंडारा पोलीस ठाणेचे पोलीसांचे ताब्यात दिले.
सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील असुन, त्यांचेविरूध्द यापुर्वी निफाड पोलीस ठाणे गुरनं १९९/२०२२ एन.डी. पी.एस. १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (२), २९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त साो, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. संदीप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वपोनि/सुशिला कोल्हे, सपोनि /विशाल पाटील, सपोउपनि / रंजन बेंडाळे, पोहवा /१७४९ भारत डंबाळे, पोना/१७३१ बळवंत कोल्हे, पोअं/२४३२ बाळासाहेब नांद्रे, पोअं/८६९ अनिरूध्द येवले, पोअं/२४२५ योगेश सानप, पोअं/२४३३ चंद्रकांत बागडे, पोअं/२३३० अविनाश फुलपगारे, मपोअं/२३६६ अर्चना भड सर्व नेम. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर यांनी कामगिरी केली आहे.