देशभरात झपाट्यानं होत असलेल्या बदलांमध्ये एक नवीन क्रांतिकारी बदल झाला आहे. आता सिमकार्ड खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस पद्धतीने होणार आहे. दूरसंचार विभाग (DoT) ने यासंबंधीचे नवीन नियम जाहीर केले आहेत, ज्यामुळे सिमकार्ड खरेदीसाठी ग्राहकांना टेलिकॉम ऑपरेटरकडे जाऊन कागदपत्रं सादर करण्याची गरज नाही.
नव्या नियमांनुसार:
- सिमकार्ड खरेदी किंवा पोर्टिंग प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने केली जाऊ शकते.
- e-KYC आणि KYC प्रणालीच्या मदतीने सर्व कागदपत्रांची सुरक्षित आणि ऑनलाईन पडताळणी केली जाईल.
- या बदलामुळे फसवेगिरी आणि बनावट सिमकार्डांच्या प्रकरणांवर आळा घालता येईल.
या नव्या पद्धतीमुळे ग्राहकांना कागदपत्रांसाठी कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरुपात पार पडेल. केंद्र सरकारने या बदलाची माहिती X प्लॅटफॉर्मवर जाहीर केली असून, यामध्ये देशातील सिमकार्ड खरेदी प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोयीची होईल.