नाशिक :- नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या आदेशानुसार, गुन्हेशोध पथकाने ८ सप्टेंबर रोजी मालधक्का रोड, सिमेंट गोडावनजवळ सापळा रचून राजू रामशिव गौतम (वय २५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल (कट्टा) व एक जिवंत काडतूस सापडले, ज्याची एकूण किंमत ३६,००० रुपये आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नाईकवाडे, मपोनि तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण सुर्यवंशी आणि गुन्हेशोध पथकाचे इतर अधिकारी व अंमलदार सहभागी होते.