नाशिक :- येथील सुप्रसिद्ध संदिप युनिव्हर्सिटी व नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना (PCCDA) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राज्यातील आणि जिल्ह्यातील ५१ गुणवंत शिक्षकांचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करून गौरव करण्यात आला. यासोबतच दहावी व बारावीच्या दिड हजार गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे ज्येष्ठ उद्योजक श्रीपाद कुलकर्णी आणि संदिप युनिव्हर्सिटीचे प्राचार्य डॉ. अरिफ मन्सुरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीसीसीडीएचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केले.
पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये जळगावचे अविनाश नाईक, सांगलीचे हणमंत निरगुडे, नगरच्या सोनाली वाघमारे, पुण्याच्या स्वाती शिंदे, मालेगावचे योगेश बोरसे यांच्यासह जिल्ह्यातील नंदकुमार देशपांडे, वैशाली भोर, सचिन जाधव, अमिन शाह, प्रवीण गडाख, जयेश सोनवणे, संदिप घायाळ, सुजित राजेगांवकर, हेनरी सरदार, कांता घाडगे, पवन जोशी, स्वप्नील कदम, विक्रांत राजगुरू, तेजस बुचके, तन्मय जगताप, लिना ठाकरे, मेघा कामळस्कर, अनिल दवणे, त्रिकुला थोरात, स्नेहा ठाकरे, मनिषा देशपांडे, कपिल हांडे, भारती जाधव, गौरी मैंद, निलेश दूसे, मनिष शहा, ओमप्रकाश चांभारे, रोहिणी देवरे, कल्पना धामणे, नरेंद्र निकुंभ, कैलास खताळे, स्नेहल बोडके, अतुल पुराणिक, युवराज कराड, मयुर जाधव, दुर्गेश तिवारी, सुनीता जोशी, दिपक शिवले, संतोष बत्तीसे, अतुल पांडे, धनंजय भामरे, जगदिश मालकर, दिपाली मोगल, सोनाली आहेर, मुकुंद रनाळकर, ओंकार फडके यांचा सन्मान स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि रोपटे देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक देशपांडे व प्रतिभा देवरे यांनी केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विवेक भोर, अण्णासाहेब नरुटे, अरुण कुशारे, खजिनदार रविंद्र पाटील, वाल्मिक सानप, विद्या राकडे, प्रमोद गुप्ता, इम्रान पटेल, जयवंत जाधव, अर्जुन शिंदे, आकाश लोहकरे, सुनील सोलंकी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.