त्र्यंबकेश्वर ता :- रविवारची सुट्टी आणि ऋषीपंचमीचा सण असा पर्वकाळ साधून चाळीस हजारावर महिला भाविकांनी
येथे ऋषीपंचमी स्नान आणि पूजेसाठी गोदावरी कुशावर्त तीर्थावर पहाटेपासूनच मोठी गर्दी केलेली आहे.
पाणी फुले वाहत ठेवत सप्तऋषींचे स्मरण करीत पूजन केले. या तीर्थावर पूर्वा भिमुख अशी गौतम ऋषी,अहिल्या मूर्ती असून साधण्यासाठी महिला भाविकांचे मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातून 40 हजार महिला सुहासिनी, ऋषिपंचमीच्या स्नानासाठी दर्शन साठी आल्या.
नदीकाठी जलाशयी अर्थात त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरी कुशावर्त तीर्थ, अहिल्या गोदावरी संगम घाट येथे महिलानी सप्त ऋषीचे पूजन करीत आघडा दूर्वा अंगावर घेत जलात टकित पुण्यदायी आरोग्यदायी स्नान केले. पोथी वाचन केली उपवास केला. या पूजेने दोष दूर होतात असे महिला भाविक मानतात.
अहिल्या होत्या संगम घाटात अलीकडे झालेल्या पावसाने पाणी साचलेले होते.
स्थानिक महिला संगम घाट तर यात्रेकरू महिला कुशावर्त तसेच संगम घाट येथे स्नान पूजा केली.
पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या तसेच तसेच तीर्थ लगत चौकातील मंदिरातील महर्षी वाल्मीक ऋषि मंदिर येथे दर्शन घेतले.दूर्वा आघाडा यांचा खच पडलेला होता.
या घाटात बारा महिने पाणी राहील असे नियोजन करण्याची मागणी भाविका मागणी भाविकांची नगरपालिकेकडे व शासनाकडे आहे. बाजारात दुर्वा आणि आघाडा नारळ यांना मोठी मागणी होती
दुपारी एक वाजेच्या सरास सुमारास पाऊस सरी कोसळली.
कुशावर्त तीर्थावरील मूर्तीचे पूजन पुरोहित नरेंद्र पेंडोळे यांनी केले केले यावेळी तीर्थांचे पुजारी गंगापुत्र बंधू उपस्थित होते.