नाशिक जिल्ह्यातील 2,172 तरुणांना ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमांतर्गत रोजगाराची सुवर्णसंधी

author
0 minutes, 2 seconds Read

नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील 2,172 तरुणांना ‘मुख्यमंत्री योजनादूत’ या उपक्रमाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यभरात 50,000 योजनादूतांची नेमणूक केली जाणार आहे, ज्यामध्ये ग्रामपंचायत आणि शहरी भागातील लोकसंख्येनुसार प्रतिनिधी नेमले जातील.

मुख्य तपशील:
मानधन: ₹10,000 प्रतिमहिना
कंत्राट कालावधी: 6 महिने (वाढवला जाणार नाही)
वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर आणि संगणक ज्ञान आवश्यक
तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि अर्जाची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.

इथे करा अर्ज https://www.mahayojanadoot.org/

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427