google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा  ‘तुळशी तलाव’ आज सकाळी साडेआठ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी देखील 20 जुलै 2023 रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. 804.6 कोटी लीटर अर्थात 8046 दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष […]

विधानसभेला होणार सुपरफास्ट व्होटींग!

लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. एकाच मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढल्याने हा गोंधळ झाल्याने आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला असून तशापद्धतीच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाला केल्या आहेत. राजकीय पक्षांनी मुंबईमध्ये लोकसभा मतदानाच्या वेळेस झालेल्या […]

विशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील घटनेमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये. या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ नये, याची कोल्हापूर जिल्हा व पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच विशाळगड घटनेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेऊन समाजात शांतता व सलोखा निर्माण करावा, अशा सूचना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री […]

मुंबईतील बिझनेसमनच्या आत्महत्येनं खळबळ

मुंबई : सागरी सेतूवरुन समुद्रात उडी मारुन ५६ वर्षांच्या भावेश सेठ यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी भावेश यांनी त्यांच्या मुलाशी व्हिडीओ कॉलवरुन बातचीत केली होती. समुद्रात उडी मारण्याआधी भावेश यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले होते. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. 

कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, पुण्यासह राज्यात असे असेल वातावरण

कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात काही जिल्ह्यात अतिमुळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई पुण्यासह विदर्भात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना […]

प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूध संकलन करावे – मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

मुंबई  : राज्‍यातील अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमूल उद्योग समुहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त 20 लाख लिटर दूधाचे संकलन करावे, असे आवाहन दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण  विखे पाटील यांनी केले आहे. या प्रक्रिया केंद्रानी सहकार्य केल्‍यास राज्‍यातील दूध उत्‍पादकांना 35/- रुपये भाव देणे शक्‍य होईल असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. राज्‍य सरकारने दूध दरासंदर्भात […]

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई :- डोंबिवली (घेसरगाव) येथून खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दि. १५ जुलै रोजी पहाटे भीषण अपघात झाला.  या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे 5 लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. कळंबोली नवीमुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात […]

कसारा घाटात भीषण अपघात, 13 प्रवासी जखमी

नाशिक :  एकीकडे मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. तर दुसरीकडे कसारा घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. कसारा घाटात विचित्र अपघात झाला असून एका कंटेनरने 6 ते 7 वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात सुमारे 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याचे समजते.  याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या कसारा घाटात […]

इचलकरंजीची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केल्याने हर्षवर्धन पाटील अडचणीत

माजी मंत्री, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाक व्यक्त काश्मीरशी केली आहे. धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असं वादग्रस्त विधान हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यात त्यांनी हे विधान केलं आहे. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभामध्ये […]

प्रकाश आंबेडकर आज मोठी घोषणा करणार; राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

छ. संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज (16 जुलै) मोठी घोषणा करणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदार शासकीय विश्रामगृहावर आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता […]