google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

अखिल भारतीय मराठा महासंघ प्रशासन विभाग नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजाभाऊ जाधव यांच्या छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालयाच्या वतीने सत्कार

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ प्रशासन विभाग नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजाभाऊ जाधव यांच्या छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालयाच्या वतीने श्री रमेश काका भोसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अविनाश वाळुंजे यांनी राजाभाऊ जाधव करत असलेल्या कामाविषयीची माहिती उपस्थितांना दिली. समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व असलेले राजाभाऊ मित्रांच्या सुखदुःखात सदैव सोबत असतात. राजाभाऊंना सामाजिक कार्याची आवड असून राजाभाऊ सदैव मदतीस तत्पर असल्याचे सांगून वाळुंजे यांनी त्यांना पुढील कार्याविषयी आणि महासंघाचे कार्य सर्वदूर पसरविण्याच्या शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांनी श्री राजाभाऊ जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *