google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

राजे बहादूर लेन मित्र मंडळातर्फे मेनरोड येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- आज राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त राजे बहादूर लेन मित्र मंडळातर्फे मेनरोड येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माजी महापौर विनायकजी पांडे,माजी आमदार योगेशजी घोलप व शिक्षण मंडळाचे माजी सदस्य राजेंद्र देसाई व सुरेश मारू यांच्या शुभहस्ते पुष्यहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश कुसमोडे व अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या सह,संदीप कानडे,संदेश फुले,सचिन बांडे,पवन सोनवणे,ऋषि भांगरे,गणेश निगडे,गोरख पाटील,सागर गरगटे,सचिन आवटी,संपत पवार,अनंत केसरीवाल आदीसह पदाधिकारी व व्यापारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त समता दिन म्हणून राष्ट्रीय एकत्मता,अखंडता यांचा संदेश दिला जातो,पंरतु प्रशासनाला यांचा विसर पडून नाशिक मनपाने त्रंबक नाका येथे उभारलेले समता,एकता चे शिल्प यानिमित्त कोणतीही साफ-सफाई केली नाही किंवा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचीही देखभाल,दुरुस्ती व स्वच्छता केली नाही म्हणून आज शाहू महाराज जयंती निमित्त राजे बहादूर लेन मित्र मंडळातर्फे त्रंबक नाका येथे नाशिक मनपाने उभारलेले एकत्मता प्रतीच्या शिल्पाची पाण्याने धुवून स्वच्छता करून परिसर स्वच्छ करण्यात आला.याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश कुसमोडे,अध्यक्ष जितेंद्र ठाकूर,काँग्रेस चे नेते सुरेश मारू,ऋषी भांगरे,पवन सोनवणे,गोरख पाटील,गणेश निगडे,युवराज परदेशी आदीसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *