google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

पेठरोड भागात पानमसाला व सुगंधी तंबाखू असा सुमारे ६५ हजार ३३५ रूपयांचा साठा जप्त…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक -शहरात गुटख्याची विक्री सुरूच असून अन्न व औषध प्रशासनाने पेठरोड भागात टाकलेल्या छाप्यात ६५ हजार रूपये किमतीचा पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी एकास बेड्या ठोकण्यात आल्या असून हा साठा विक्रीसाठी साठवणुक करण्यात आला होता. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
जतेश महेंद्रभाई ठक्कर (रा.शिवछाया सोसा.पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत एफडीएचे अधिकारी अमित रासकर यांनी फिर्यद दिली आहे. शिवछाया सोसायटीत बेकायदा गुटख्याचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी (दि. २१) सकाळी छापा टाकला असता फ्लॅठ नं. डी १०३ मध्ये वेगवेगळ््या कंपनीची पानमसाला व सुगंधी तंबाखू असा सुमारे ६५ हजार ३३५ रूपयांचा साठा आढळून आला. याबाबत ठक्कर यास बेड्या ठोकत पथकाने मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *