google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

 कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका; एकास अटक

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- आडगाव शिवारातील एका शेतात पत्र्याच्या खोलीत कत्तलीच्या उद्देशाने डांबलेल्या गोवंश जातीच्या तेवीस जनावरांची आडगाव पोलिसांनी सुटका केली आहे.पथकाने छापा मारुन १ लाख ६४ हजार रुपयांची जनावरे ताब्यात घेतली.याप्रकरणी रशिद ईस्माईल सैय्यद (वय ५०, रा. जुना पाझर तलाव, आडगाव शिवार) या संशयिताला अटक केली आहे.अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करण्यासह डांबून ठेवण्याच्या प्रकारांवर नजर ठेवत धडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार ज्ञानेश्वर कहांडळ, निखील वाघचौरे, इरफान शेख व अमोल देशमुख यांना गस्तीदरम्यान गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना कळविल्यानंतर उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त नितीन जाधव यांच्या सूचनेनुसार सापळा रचण्यात आला.
त्यानंतर सहायक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक प्रवीण दाइंगडे, मयूर निकम, सहायक उपनिरीक्षक अभिमन्यू गायकवाड, अशोक वस्ते, अंमलदार सुरेश नरवडे, दिनेश गुंबाडे यांच्या पथकाने आडगाव शिवारातील शिंदे वस्ती रस्त्यावरील एका शेतातल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला. तिथे निर्दयीपणे, दाटीवाटीने गोवंश जातीचे २३ जनावरे पथकाला दिसली. त्यामध्ये गायी व गोऱ्यांचा समावेश आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *