google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

त्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शनासाठी ऑनलाईन पास देण्याचे विचाराधीन…

author
0 minutes, 1 second Read

 आगामी श्रावण महिना आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर आता त्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शनासाठी ऑनलाइन पास देण्याचं विचाराधीन आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देवस्थान उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात आले. 

गेल्या काही महिन्यांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होत असून दर्शन रांगेत नुकतीच एका भाविकाला देवस्थानच्या सुरक्षारक्षकाकडून मारहाण झाली होती. त्यानंतर गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजनांसाठी प्रयत्न केले जात आहेत. 

ऑनलाईन पासच्या मुदतीतच घ्यावे लागणार दर्शन

तिरुपती बालाजीच्या धरतीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानातही दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन पास देण्याचे नियोजन सुरू असून पासच्या मुदतीतच दर्शन घ्यावे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये भाविकांना मुखदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क वाढविण्यावर होणार विचार 

त्र्यंबकेश्वर देवस्थानात भाविकांना व्हीआयपी (VIP) दर्शन देण्यासाठी देणगी दर्शनाचे शुल्क वाढवण्यावर विचार होणार आहे. सध्या 200 रुपये देणगी देऊन व्हीआयपी दर्शन घेता येते. येत्या एक-दोन दिवसात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची बैठक होणार असून ऑनलाईन पास आणि सशुल्क दर्शन देण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *