google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

धोनीचा यंदाचा वाढदिवस खास, सलमान खानसोबत जंगी सेलिब्रेशन…

author
0 minutes, 2 seconds Read

मुंबई– भारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी असलेल्या माही म्हणजचे महेंद्रसिंग धोनीचा आज ७ जुलै रोजी वाढदिवस आहे. धोनी आज त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करतोय. धोनीच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. धोनीचे चाहते त्याला त्याच्या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक धोनीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात बॉलिवूडचा भाईजान सलमान त्याच्यासोबत सेलिब्रेशन करताना दिसतोय. सलमानने धोनीसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केलाय.

महेंद्रसिंग धोनी हा सर्वात यशस्वी विकेटकिपर, बॅट्समन आणि कॅप्टनपैकी एक मानला जातो. मैदानातला त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने धोनीला शुभेच्छा देणारी पोस्ट Instagram वर शेअर केली आहे. याशिवाय, व्हायरल होत असलेल्या एका क्लिपमध्ये, दोन्ही दिग्गज वाढदिवस एकत्र साजरा करताना दिसत आहेत. ब्लॅक शर्ट आणि सिग्नेचर डेनिम्स घातलेला सलमान बर्थडे बॉयच्या शेजारी उभा होता. धोनीने एक नाही तर तीन खास केक कापले. धोनीने केक कापला तेव्हा भाईजानने त्याला आधी त्याच्या पत्नीला भरवायला सांगितले. त्यानंतर त्याने स्वत: खाल्ला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *