google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

त्र्यंबक नगरी भक्ती रसात निघाली नाहून,संत निवृत्तीनाथमहाराज रथमिरवणूक उत्साहात संपन्न.

author
0 minutes, 0 seconds Read

श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर नगरीमध्ये ब्रह्मगिरी च्या पायथ्याशी असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेतील मुख्य आकर्षण रथ मिरवणूक सोहळा भक्तिमय वातावरणात सायंकाळी संपन्न झाला.पौषवारीची शासकीय महापूजा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पहाटे संपन्न झाली सायंकाळी साडेचार वाजता श्री संत निवृत्तीनाथांचा चांदीचा रथ मिरवणुकीस मंदिरापासून प्रारंभ झाला. चांदीच्या रथाला सजवण्यात आले होते यातसंत निवृत्तीनाथ महाराजांची मूर्ती व पादुका होत्या. रथाच्या पुढे पताका धारी,वारकरी डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला, वारकरी कीर्तनकार, यांचा सहभाग होता. वारकरी टाळ मृदुंग गजर भजन कीर्तन करत होते.रथावर गर्दी करू नये यासाठी सूचना दिल्या जात होत्या. बैलांच्या जोडीने रथ ओढला.सुंदराबाई मठ तेली गल्ली पोस्टलेन त्रंबकेश्वर मंदिर लक्ष्मीनारायण चौक कुशावर्त तीर्थ ते संत निवृत्तीनाथ मंदिर असा रथाचा मार्ग होता. रथ मार्गावर रस्ता नगरपालिकेने स्वच्छता केली होती.नागरिकांनी रांगोळ्या काढून रथाचे स्वागत केले .त्रंबकेश्वर मंदिरात संत निवृत्तीनाथ त्रंबकेश्वर यांची भेट घडवण्यात आली. तर तीर्थराज कुशावार्तावर गोदावरी पादुका स्नान झाले. साडेसात वाजता रथ मंदिरात परतला.यावेळी मंदिराचे विश्वस्त पुजारी उपस्थित होते.दरवर्षी जाणवणारा विशेष उत्साह यावर्षी पालखी सोहळ्यात जाणवला नाहीपालखी सोहळा प्रसंगी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता. निवृत्तीनाथ मंदिराचे विश्वस्त कर्मचारी वर्ग पालखी सूचना करत होते. निवृत्तीनाथांच्या जयघोषाने त्रंबक नगरी भक्ती रसात नाहून निघाली.पालखी मार्गावर अतिक्रमण हटवण्यासाठी नगर पालिका दक्ष होती. पालखी रथाचा सोहळा व संत निवृत्तीनाथांच्या चरणी लीन होत वारकरीधन्य झाले कृतार्थ झाले. मोठ्या प्रमाणावर हजारो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली होती.त्यामुळे त्रंबकेश्वर पंचक्रोशी भक्ती रसात नाहुन निघाली. यावर्षी पोष वारीमध्ये साडेतीनशे हुन अधिक दिंड्या सहभागी झाल्या होत्या…

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *