सिन्नर तालुक्यात विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना आव्हान देण्यासाठी उदय सांगळे गेल्या चार-पाच दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेशासाठी मुंबईत ठाण मांडून बसले उदय सांगळे यांचा मंगळवारी दिनांक २२ ऑक्टोबर रोजी वाय. बी. चव्हाण सेंटरला शरद पवार व प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थिती पक्षात अधिकृत प्रवेश झाला. त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सांगळे असणार आहे
उदय सांगळे पक्षप्रवेश करून सिन्नर तालुक्यात पोहचल्यावर विविध ठिकाणी स्वागत होत होते
सिन्नर शहरात येताच सांगळे समर्थकांनी ढोल ताशां तसेच फटाक्याच्या आतिषबाजीत रात्री उशिरा पर्यंत स्वागत करण्यात आले परंतु सिन्नर मध्ये जणू आचार संहिता नाही की काय असे वातावरण तयार झाले होते पोलीस प्रशासनाचा एक ही कर्मचारी या वेळी पाहायला मिळाला नाही