google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

छगन भुजबळ राजीनामा दिला मग मंत्रीपदाचे फायदे पोलीस संरक्षण का सोडले नाही?-करण गायकर…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- छगन भुजबळ कालच्या सभेमध्ये बोलताना बोलून गेले की मी 16 तारखेलाच मंत्रिपदाचा राजीनामा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देऊन आलो आहे. राजीनामा दिल्याची प्रत भुजबळांनी जग जाहीर करावी तसेच ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळीच शासनाच्या सगळ्या सोयी सुविधा पोलीस संरक्षण शासनाने दिलेली वाहन छगन भुजबळांनी तात्काळ का सोडली नाही.दिखावा करून सहानुभूती मिळवणे हे भुजबळांचे जुने कारस्थान आहेत.

भुजबळांना आता ओबीसीचा नेता कोणी मानत नसल्याने भुजबळ अशे वैफल्यग्रस्त टीकाटिपणी करून स्वतःचे नेतृत्व बळजबरीने ओबीसी समाजावर लादत आहेत परंतु ओबीसी समाज हा आता हुशार झाल्याने भुजबळांच्या या डावात फसत नसल्याने भुजबळ सातत्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका करत आहेत.भुजबळ यांनी ओबीसी मधल्या अनेक जातीय समूहांना मुद्दाम भडकावून त्या समूहांचा अपमान करून त्यांची व्यवसायात उपासमार कशी होईल आणि मग हे ओबीसीतील छोटे घटक गार होऊन या समाजातील तरुण भुजबळांचा उदो उदो करण्यासाठी पुढे येतील हे डावपेच आखून ओबीसी घटकातील समाजाला मराठा त्याच्या विरोधात भडकावून स्वतःच्या सभा मोठ्या करण्याचा बालहट्ट छगन भुजबळ करताय. पण त्यांना यातही यश येत नाहीये म्हणून भुजबळ मराठा समाजाला व समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांवर गरळ ओळखण्याची एकही संधी सोडत नाही.

राहिला विषय मराठा समाजाने कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे तर छगन भुजबळ यांना आम्ही सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटील मराठ्यांचे नेते आहेत.मराठा समाजाला त्याबाबत कुठलीही अडचण नाही कारण ते तुमच्यासारखे भ्रष्टाचारी नाहीत जेलमध्ये गेलेले नाहीत कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यामुळे मराठा समाज गर्वाने त्यांच्यासोबत राहून त्यांना नेता मानत आहे परंतु तुम्ही मोठे मोठे घोटाळे करून जेलमध्ये गेला तरी तुम्हाला वाटतं ओबीसी समाजाने तुम्हाला नेते मानावं असं कसं चालेल भुजबळ साहेब स्वतः एवढे मोठे भ्रष्टाचार करेल असताना सुद्धा तुम्हाला ओबीसीचा नेता लोकांनी म्हणावं असं वाटत असेल तर आम्हाला मराठ्यांना स्वच्छ प्रतिमेचे मराठा समाजाला मायबाप मानणारे मराठा योद्धा जरांगे पाटील नेते म्हणून कायम मान्य असतील त्यात तुमचे का पोट दुखते हे आम्हाला कळत नाही.

तुमच्यात हिम्मत असेल तर तात्काळ शासनाच्या सगळ्या सोयी सुविधा सोडून द्या सर्वसामान्य म्हणून खुशाल तुम्हाला जे काही बोलायचे ते बोला परंतु संविधानिक पदावर राहून यापुढे आता भुजबळांनी अकलेचे तारे तोडू नये आणि राजीनामा दिला म्हणून सगळीकडे सहानुभूती मिळवत फिरू नये हा इशारा आम्ही भुजबळ साहेबांना देत आहोत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *