google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी,नवमी ते चतुर्दशी या कालावधीमध्ये होणार संपन्न..

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक: : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी रविवार दिनांक ४ फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी पर्यंत अर्थात नवमी ते चतुर्दशी या कालावधीमध्ये संपन्न होत आहे निवृत्तीनाथांच्या जन्म सप्तशतकोत्तरी वर्षाचे औचित्य साधून मागील वर्षापासूनच वेगवेगळे उपक्रम निवृत्तीनाथ संस्थांनच्या वतीने हाती घेण्यात आलेले आहेत. या पौष वारी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरचे नियोजित दगडी सभामंडपाची पायाभरणी झाली असून उर्वरित कामही लवकरच पूर्णत्वास येणार आहे.

रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा निवृत्तीनाथ यात्रोउत्सव पहाटे पाच वाजता काकडा पूजनाने व नित्य आरतीने होणार असून सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांचे संत महंतांचे स्वागत निवृत्तीनाथ संस्थान तर्फे करण्यात येणार आहे. या कालावधीत रात्री सात ते आठ हरिपाठ तसेच रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत परंपरेची कीर्तन सेवा पार पडणार आहे.मंगळवार दि.६ रोजी पहाटे चार वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीची शासकीय महापूजा होणार असून दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत यात्रोत्सवाच्या परंपरेप्रमाणे संत निवृत्तीनाथांच्या रथाची नगरप्रदक्षिणा होणार आहे. ज्योतिर्लिंग त्रंबकराज व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ भेट परंपरेप्रमाणे होईल याच वेळी तीर्थराज कुशावर्त येथे नाथांच्या पादुकांवर जलाभिषेक करण्यात येईल.दि.८ फेब्रुवारी रोजी काल्याचे किर्तन होणारा सून याच दिवशी संस्थांनच्या वतीने आलेल्या दिंड्या पालख्यांना मानाचा नारळ प्रसाद देण्यात येईल. दि.९ फेब्रुवारी रोजी अर्थात चतुर्दशीच्या दिवशी प्रक्षालन पूजेने निवृत्तीनाथ यात्रा उत्सवाची सांगता होईल.

पौषवारी निमित्त परंपरेच्या कीर्तन सेवा आहेत त्या याप्रमाणे

रविवार दि.४ रोजी नवमीला ह भ प रमेश महाराज एनगावकर, दिनांक ५ रोजी दशमीला मोहन महाराज बेलापूरकर, दि.६ रोजी एकादशीला संत मुक्ताबाई संस्थानतर्फे किर्तन सेवा होईल. दि. ७ रोजी द्वादशीला बाळासाहेब महाराज देहूकर,डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांची कीर्तन सेवा होईल. त्रयोदशीला दि.८ कान्होबा महाराज देहूकर, यांचे काल्याचे किर्तन होऊन मानाच्या व परंपरेच्या कीर्तनाची सांगता होईल.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचे दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या नाशिकच्या नियोजित दौऱ्यावर येत आहेत या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी स्थानावर ते भेट देतील असे त्यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त प्रसारित केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, दरम्यान निवृत्तीनाथ संस्थान राज ठाकरे यांना या संदर्भात निवेदनही देणार आहेत.पौष वारी साठी त्र्यंबक नगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांनी यापूर्वी निवृत्तीनाथ संस्थांनच्या विश्वस्त मंडळाशी चर्चा बैठका व विचारविनिमय केला असून येणारा यात्रोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा असे आवाहन निवृत्तीनाथ संस्थान तर्फे अध्यक्ष निलेश गाढवे सचिव ऍड. सोमनाथ घोटेकर, प्रसिद्धी प्रमुख तथा विश्वस्त अमर ठोंबरे, पालखी प्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त माधवदास महाराज राठी, श्रीपाद महाराज कुलकर्णी, राहुल महाराज साळुंखे, नवनाथ महाराज गांगुर्डे, जयंत महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, तसेच ह भ प कांचन ताई जगताप आदींनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *