google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मराठा उत्कर्ष च्यावतीने मराठा उपोषणकर्त्यांचा सत्कार

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेच्या वतीने काल दिनांक 30 जानेवारी रोजी सकल मराठा समाज उपोषणकर्ते माननीय श्री. नानासाहेब बच्छाव, माननीय श्री रामभाऊ खर्दूळ तसेच माननीय श्री करणजी गायकर आणि सहकारी यांचा संस्थेच्या उत्तमहिरा सभागृहात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. प्रास्तविक संस्थेचे सरचिटणीस श्री. अशोक देवकर यांनी केले आणि सांगितले की मराठा आरक्षण मिळविण्यात सत्कार मूर्तिचां कशाप्रकारे सहभाग होता याचे विवेचन केले.
संस्थेचे जेष्ठ संचालक व सल्लागार मा.श्री हरिभाऊ शेलार यांच्या हस्ते श्री नानासाहेब बच्छाव यांचा सत्कार करण्यात आला. श्री. रामभाऊ खर्दूळ यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच श्री. करणजी गायकर यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अंबादास संधान यांचेहस्ते करण्यात आला. श्री. विक्रांत गायधनी यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अरुण मोरे यांच्याहस्ते करण्यात आला तसेच श्री. निलेश ठुबे पाटील यांचा सत्कार श्री. अशोक देवकर यांच्याहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना श्री. नानासाहेब बच्छाव यांनी उपोषण स्थळी – शिवतीर्थ, नाशिक येथे हे 105 दिवसाच्या काळात काय काय धडामोडी घडल्या यावर प्रकाश टाकला. श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याने प्रेरित होऊन सकल मराठा सामाज्याला आरक्षण मिळण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवून सर्व मराठा समाज्याने आपला पाठिंबा दिला यांचे योगदान कशाप्रकारे लाभले हे सांगितलं व अभिनंदन केले.
त्यानंतर श्री. रामभाऊ खर्दूळ आणि श्री. करणजी गायकर यांनी आपले मौलिक विचार मांडले आणि मनोगत व्यक्त केले..
याप्रसंगी उपस्थित सर्वश्री. ज्ञानेश्वर सुरासे, योगेश नाटकर,आण्णा पिंपळे, श्रीराम निकम, संदीप खुंटे पाटील, हर्षल पवार, रमेश पवार, हिरामणनाना वाघ, डी एल जाधव, सोपान गांगुर्डे, शिवाजी भुजंगे, समीर भांगरे, विवेक कदम, दत्तात्रय कोरडे, शांताराम ताजनपुरे,अविनाश वाळुंजे ,सुधाकर चांदवडे, ज्ञानेश्वर पळसकर आणि दिपक जाधव हे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *