google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मराठ्यांचा वनवास संपला

author
0 minutes, 0 seconds Read

मराठा समाज गेल्या 43 वर्षे आपल्या हक्काचे आरक्षण मागतोय, मात्र सत्तेत असणाऱ्या धूर्त मराठ्यांनी मराठयांची केवळ मते लाटली, सत्तास्थाने कमावली, मात्र गरजवंत समाज देशोधडीला लावला, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तेही शिक्षण व रोजगाराचे म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी लाखोंचे मोर्चे काढले मात्र सरकारने निराशा केली म्हणून त्यांनी आरक्षण मिळाले नाही म्हणून बलिदान दिल, त्यानंतर मराठ्यांनी 58 मराठा मोर्चे काढले, त्यांची जगाने दखल घेतली, मात्र सरकार व मराठा सत्तास्थाने मात्र आंधळी बहिरी होती,मराठा समाज जो केवळ शेतीवर पोट भरायचा, स्वाभिमानाने जगायचा त्याला मात्र शेतीचे तुकडे झाले, भुदान चळवळीत मराठ्यांनी जमिनी दान दिल्यात, मात्र उरल्या सुरल्या जमिनीत पोट भरेना,मुलांचे लाखोंचे फी,नोकऱ्या नाही आरक्षण नाही यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आणि युवकांनी नोकऱ्या नाही म्हणून जीव संपवला, हे मराठ्यांवर आलेलं अरिष्ट बघता क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील सारखा क्रांतिकारी योद्धा मराठवाड्यात समस्त मराठा समाजाचा आवाज बनला, घरादारावर तुळशी पत्र ठेवून आपल्या सामान्य व्यक्तित्वाने त्याने मराठ्यांच्या कोटीच्या सभा घेतल्या, मोर्चे उपोषणे केली, मात्र निर्धावलेले सत्ताधारी व मराठा विरोधकांची नस दाबन्यासाठी अखेर मुंबईत कोटी मराठे चाल करून गेले व सरकारला जाग आली, अद्यादेश काढून महत्वाच्या मागण्या मान्य केल्या,आजचा दिवस क्रांतिकारी आहे आम्ही लढा जिंकला आणि यामागे लढणारे असंख्य मराठे आहेत, तसेच नाशिकच्या शिवतीर्थ वर नाना बच्छाव या शेतकरी चळवळीतील सामान्य युवक नाशिकच्या 105 दिवसाच्या मराठा लढ्याचा श्वास बनला त्याच्या त्यागाने नाशिक जिल्हा एकवटला, त्या नाना बच्छाव या क्रांतियोध्यास नाशिक विसरणार नाही,

प्रतिक्रिया
राम खुर्दळ (प्रवक्ता सकल मराठा समाज नाशिक जिल्हा,)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *