google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

गाव खेड्यावर मराठा आरक्षणाचा विजयी जल्लोष

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील गाव खेड्यात ही मराठा आरक्षण लढ्यातील विजयाचा गुलाल उधळला गेला, पेढे वाटून आनंद साजरा केला गेला, दुगावं ता जि नाशिक येथे तर मिरवणूक काढून पेढे वाटून मराठा आरक्षण लढ्यातिल विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला,या विजयी मिरवणूकिचा नारळ सकल मराठा समाजाचे प्रचारक मित्र रांम खुर्दळ यांनी फोडला, तर हभप कृष्णा महाराज धोंडगे यांच्या प्रस्तावने नंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची आरती करून गुलाल उधळण्यात आला,

यावेळी राम खुर्दळ यांनी मराठा समाजाची एकजूट व मराठा क्रांतिकारी योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याचे क्रांतिकारी पाऊल बघता हा मराठयांचा लढा गाव खेड्यात पोहोचला, तर कित्येक लढे लढून ही आरक्षनाकडे दुर्लक्ष करणाऱ्यां सरकारला ठिकाणावर करोडो मराठ्यांनी मुंबईत केलेला प्रवेश होता अन हा मराठा सागर बघता अखेर सरकार झुकले आपल्या मूलभूत मागण्या मान्य झाल्या आतां दिवाळी करा, गुलाल उधळा, एकी ठेवा,गरजवंत मराठ्यांना साथ द्या, तरुणांना रोजगार द्या, व्यसनमुक्त गाव करा, लग्नातील उधलपट्टी थांबवा हा संदेश दिला,यावेळी दुगावं गावातील महिला, युवक, मुलं, मुली, सर्व ग्रामस्थ मिळून गावात मराठा विजयी मिरवणूक आनंदात झाली,यावेळी दुगावं गावातील सर्वांचे योगदाना बद्दल आभार मानन्यात आले, मावळ व नाशिकच्या सभेत मराठा आरक्षणाचे भाषण करणारे हभप कृष्णा महाराज यांचे ही टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले, गावातील युवकांचा उत्साह व मिरवणूकित सहभाग मोठा होता

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *