google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक लढ्यासाठी नाशिकमधील हजारो मराठा समाज बांधव पुण्याकडे रवाना आरक्षण घेऊनच परत येणार – करण गायकर

author
0 minutes, 0 seconds Read

नासिक :- नाशिक येथील शिवतीर्थ येथून हजारो मराठा समाज बांधव शेकडो वाहनांच्या ताफ्या सह मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याकडे रवाना झाले आहे.आज सकाळी नऊ वाजता नाशिक मधील सर्व समाज बांधव छत्रपती शिवरायांचे शिवस्मारक सीबीएस येथे एकत्रित येत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मराठ्यांच्या ऐतिहासिक लढ्यासाठी घोषणाबाजी देत पुण्याकडे निघाले.लढेंगे जितेंगे हम सब जरांगे, कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय,एक मराठा लाख मराठा, एकच वारी मुंबईवर स्वारी अशा विविध प्रकारच्या घोषणांनी नाशिक शहर मराठा क्रांती मोर्चाच्या शिलेदारांनी दणाणून टाकले.

रॅली ची सुरुवात शिवस्मारक ते मुंबई नाका या ठिकाणापर्यंत पायी रॅली काढल्यानंतर शेकडो वाहनांनी हा मोर्चा नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पुढे मार्गस्थ झाले.यावेळी पत्रकार बांधवांशी संवाद साधताना मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली यावेळी ते म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री हे आरक्षण प्रश्र्नी वेळ काढूपणा करत आहे जर मराठा समाजाला आरक्षण द्यायच असेल तर ते दोन दिवसात देऊ शकतात, मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जर राज्य सरकारने पावले उचलली तर मराठ्यांचे हे वादळ मुंबईत येण्यापासून ते रोखू शकतात परंतु मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पावले उचलली नाही तर मराठा वादळ हे निश्चित मुंबई काबीज करतील आणि मग जो काही परिणाम होईल त्यास राज्य सरकार संपूर्ण जबाबदार असेल.

तसेच स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेते म्हणणारे छगन भुजबळ यांनी हे मराठ्यांच वादळ बघून घ्यावे आमचे त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी भायखळ्याच्या पुलावर उभ राहून मोर्चात असलेले लोक मोजण्याचे मशीन घेऊन उभे रहावं आणि येणार मराठ्यांचा वादळ किती कोटीचा आहे हे मोजून दाखवावे. पण हे मोजत असताना कदाचित ते गर्दीत हरवले तर याची जबाबदारी मराठा समाजाची राहणार नाही असा खोचक टोला त्यांनी छगन भुजबळ यांना लगावला.यावेळी मराठा आंदोलक नानासाहेब बछाव संवाद साधताना म्हणाले की आज नाशिक मधून हजारो किलोचे तांदळाचे कट्टे, शेकडो लिटर तेलाचे डबे, डाळ,शेंगदाणे यांसह अन्य अन्नधान्याची रसद घेऊन नाशिक मधील मराठे हे मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी पुण्याकडे रवाना होत आहे, राज्य सरकारने आता आमचा अंत पाहू नये, मराठ्यांचा अंत पाहणाऱ्याचा अंत आता जवळ आलेला आहे हे आता आम्हाला वाटायला लागलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर स्वतःची खुर्ची वाचवायची तर मराठा योद्धा जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या त्यांनी तात्काळ पूर्ण कराव्या अन्यथा ज्या पद्धतीने मराठवाड्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने जरांगे पाटलांबरोबर सहभागी झाला त्याच पद्धतीने उत्तर महाराष्ट्रा ही यात सगळ्यात पुढे असेल आणि हे सगळं मराठ्यांचे शक्ती प्रदर्शन राज्य सरकारला देखवणार नाही त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाजाचा प्रश्न मिटवावा ही सरकारला विनंती केली.

नाशिक मधून निघालेल्या रॅलीमध्ये शिवाजी सहाणे, चंद्रकांत बनकर, सुनील भाऊ बागुल,राजू देसले,नितीन रोटे पाटील,आशिष हिरे, डॉक्टर सचिन देवरे, योगेश नाटकर व्यंकटेश मोरे,सोमनाथ जाधव, मामा राजवाडे,अजय बागुल, निलेश मोरे,सचिन पवार, संजय पडवळ, राम पाटील,वैभव दळव, उल्हास बोरसे,कैलास खांडबहाले, एकता खैरे, शिल्पा चव्हाण,ममता शिंदे,पुंडलिक बोडके, ज्ञानेश्वर कवडे,निलेश ठुबे, ज्ञानेश्वर सुराशे, संदीप कुटे ,राम निकम,प्रफुल वाघ, अजित नाले,विक्रांत देशमुख, अमित नडगे, भारत पिंगळे,कृष्णा महाराज धोंडगे, बालाजी धोंडगे बाळासाहेब लांबे यांसह मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *